आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोतोपरी सहकार्य करणार:नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार; महसुलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. आगामी काळात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे आपले एकच ध्येय असून, दुष्काळी भागातील लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी केले. नगर तालुक्यातील वाळुंज येथे आयोजित राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बुऱ्हाणनगर येथे १९५ कोटी रुपयांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याचा योजनेच्या भुमीपुजनाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, प्रतिभा पाचपुते आणि अक्षय कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात साकळी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाईल. बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस या शासनाने मंजुरी दिली असून या योजनेच्या माध्यमातुन या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. येत्या काळात जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, बंद पडलेले उद्योग सुरू करणेबाबत तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...