आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:नगरच्या संघाने पटकावला योगासन स्पर्धेचा किताब

संगमनेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आळंदी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योगासन व जनरल चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या योगासन संघाने अप्रतिम सादरीकरणाच्या जोरावर अजिंक्यपदाचा किताब पटकावला. संघाने योगासनांच्या चारही प्रकारात सरस कामगिरी करताना चौदा सुवर्ण, सहा रौप्य व चार कास्यसह २३ पदकांची कमाई केली. पाच खेळाडूंना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमानाने यावेळी सन्मानित करण्यात आले, तर संघाला जनरल चॅम्पियनशिपचा किताब देण्यात आला.

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. योगासनांमध्ये नगर जिल्हा संघातील तृप्ती डोंगरे, नीरल वाडेकर, देवांशी वाकळे, आर्यन खरात, प्रणव साहु, अंश मयेकर, तन्वी रेडिज, रुद्राक्षी भावे, मृणाली बाणाईत, सुमीत बंडाळे, रुपेश सांगे, प्रीत बोरकर, स्वरा गुजर, निबोध पाटील, नानक अभंग, यश लगड, तन्मय म्हाळणकर, गीता शिंदे आदींनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संघाला शिखरावर पोहोचवले. स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावणार्‍या तृप्ती डोंगरे, तन्वी रेडिज, रुद्राक्षी भावे, सुमीत बंडाळे व निबोध पाटील यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स बहुमानाने गौरवण्यात आले.

स्पर्धेसाठी एमआयटी विश्व शांति विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली योग विभाग प्रमुख प्रा.डॉ. निरंजन खेरे यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ. संजय मालपाणी, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कासगवारे, बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सचिव डॉ. अरुण खोडस्कर व डॉ. सुनंदा राठी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

५०० खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांचे परीक्षण ६५ पंचांनी केले.राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा किताब पटकवणाऱ्या नगर जिल्हा संघातील सर्व योगासन खेळाडू संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी आहेत. योगासनांचा खेळात समावेश झाल्यापासून देशभरातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत एकामागून एक किताब पटकावणाऱ्या या खेळाडूंनी राज्यासह नगर जिल्ह्याचा बहुमान वाढवला आहे.

बातम्या आणखी आहेत...