आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध होणारे कमी पाणी यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाण वत आहे. या दृष्टीने भविष्याची गरज लक्षात घेऊन नगर शहराला पन्नास वर्षांनंतर अमृत पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले. या योजनेचे काम आता पूर्ण झाले. नगर शहराला मुबलक ११८ लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगर शहराचा कायमस्वरुपीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. वसंत टेकडी येथील जुन्या ६८ लाख लिटर पाण्याची टाकी कार्यान्वित करून पाणीपुरवठा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेवक समद खान, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, अमोल गाडे, तायगा शिंदे, नगरसेवक मनोज दुल्लम, बाबा खान, भा कुरैशी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, नगर शहराला वसंत टेकडी येथील जुनी ६८ लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षाची ही टाकी असल्यामुळे तिची गळती सुरू झाली होती. दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते काम पूर्ण होऊन आज या टाकीमध्ये पाणीपुरवठा करून कार्यान्वित केली आहे. त्यामुळे शहराला ६८ लाख लिटर पाण्याची टाकी व ५० लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.
नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी मिळेल मुळा धरणातून अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे पाण्याची मोटर बसवण्याचे काम लवकरच पूर्ण होऊन अमृत पाणी योजनेचे पाणी वसंत टेकडी येथे पडणार आहे. त्यामुळे सुमारे ११८ लाख लिटर पाणी नगरकरांना प्रतिदिन मिळणार आहे. नगर शहराचा अनेक वर्षांचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लागून पूर्ण दाबाने नगरकरांना पाणी मिळेल, असे आमदार जगताप म्हणाले.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.