आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:मनपात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या दुचाकीस्वारांना आयुक्तांकडून दणका

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आवारात बेशिस्तपणे दुचाकी वाहने लावणाऱ्या वाहन चालकांना आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी दणका दिला. आवारात नियुक्त कर्मचाऱ्यांना फैलावर घेत आयुक्तांच्या आदेशानुसार बेशिस्त लावलेल्या दुचाकींची हवा सोडण्यात आली. बेशिस्त पार्किंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्याला आयुक्तांनी एक हजाराचा दंड ठोठावला आहे.

बुधवारी सकाळी आयुक्त जावळे महापालिकेत आले असता, प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच दुचाकी लावलेल्या दिसल्या. बेशिस्तपणे लावलेल्या ुचाकींमुळे अधिकारी, पदाधिकाऱ्यांची वाहने आत नेण्यास अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यात दुचाकी लावण्यात येऊ नयेत, अशी सूचना देणारा फलकही लावलेला आहे. तरीही अस्ताव्यस्त दुचाकी लावलेल्या होत्या. आयुक्तांनी शिपाई कर्मचाऱ्यांना बोलावून घेत इतरत्र लावलेल्या दुचाकींची हवा सोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आयुक्त जावळे स्वतः हवा सोडेपर्यंत आवारात तळ ठोकून उभे होते.

दरम्यान, आयुक्तांच्या या कारवाईची माहिती कार्यालयात पसरताच अनेकांनी दुचाकी काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अनेक दुचाक्यांची हवा सोडली होती. यात नागरिकांसह मनपा कर्मचारी व नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचीही हवा सोडली गेल्याने त्यांच्यावर धक्का मारण्याची वेळ आली. बेशिस्त दुचाकीस्वारांना अद्दल घडवल्याने काही उपस्थित नगरसेवकांनीही त्यांच्या कारवाईचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...