आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सण-उत्सवातून पर्यावरण रक्षणाची‎ संकल्पना पुर्नस्थापित करावी; ता‌ठे‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या संस्कृतीत नदी, डोंगर,‎ भूमि, पशू-पक्ष्यांनाही मानाचे स्थान‎ दिले आहे. निसर्ग आपणास सर्व‎ काही देत असल्याने त्याचे रक्षण‎ करणे ही आपली जबाबदारी आहे.‎ पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने‎ सध्याच्या वातावरण बदलाने अनेक‎ समस्या निर्माण होत आहेत. यासाठी‎ आपली संस्कृती सण-उत्सवातून‎ पर्यावरण रक्षणाची संकल्पना‎ पुर्नस्थापित करण्याची गरज‎ असल्याचे प्रतिपादन नगरसेविका‎ वंदना ताठे यांनी केले.‎ प्रभाग क्रमांक ६ मध्ये‎ नगरसेविका ताठे यांच्या वतीने‎ हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले होते. याप्रसंगी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महिलांना वाण म्हणून कापडी‎ पिशव्यांचे वाटप करण्यात आले.‎

ताठे म्हणाले, की आपला प्रभाग‎ स्वच्छ व सुंदर निर्माण करण्यासाठी‎ विविध उपक्रम हाती घेण्यात आले‎ आहेत. प्रत्येक भागाचा विकास‎ झाला पाहिजे. त्या दृष्टीने प्रत्येक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ भागात कामे होत आहेत.‎ विकासकामांबरोबरच कचरामुक्त‎ प्रभागाच्या संकल्पेत महिलांचा मोठा‎ वाट राहिला आहे. सण-समारंभातून‎ महिलांनी एकत्र येऊन आपला‎ विकास साधावा. त्यासाठी आपण‎ सर्वोतोपरी सहकार्य करू.‎

बातम्या आणखी आहेत...