आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरला दुकानात:दुभाजक ओलांडून कंटेनर शिरला दुकानात

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यधुंद असणाऱ्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून वेल्डिंगच्या दुकानात शिरला. ही घटना नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा मोटेवाडी नजीक येथे रविवारी सांयकाळी ६ च्या सुमारास घडली. या कंटेनरने वेल्डिंग काम करत असणाऱ्या आयशरला (एमएच १६, सीई ९३९४)धडक दिली.

ही धडक इतकी जोरात होती की त्या ठिकाणी दुकानाचे शटर व गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या ठिकाणी एकच कामगार काम करत होता इतर कामगार बाहेर गेले असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात होताच तेथील गाडीने पेट घेतला होता.परंतु तेथील नागरिकांनी ती आग विझवली. कंटेनर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे नागरिकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...