आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुस्ती या प्रकारानेच भारताला पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले होते. भविष्यात अशा महिलांच्या कुस्ती स्पर्धा देशभर होतील. कर्जत येथे होत असलेल्या कुस्ती स्पर्धेतून अनेक पालक प्रेरणा घेऊन, मुलींना कुस्तीगीर बनवण्याची तयारी करतील, भविष्यातील अनेक ऑलिम्पिकपटू अशा स्पर्धेतून भारताला मिळतील, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. सोनवणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी स्पर्धेचे निमंत्रक व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष राजेंद्र फाळके, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समिती सदस्य आमदार रोहित पवार, डॉ. दीपक माने, सहाय्यक क्रीडा संचालक डॉ.दत्ता महादम, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे ,अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे निरीक्षक डॉ. राजेंद्र खत्री, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, मधुकर कन्हेरकर, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, बाळासाहेब साळुंखे, विजय मोडले, सुभाषचंद्र तनपुरे, शरद शिंदे उपस्थित होते. आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी देशभरातील १३० विद्यापीठातील संघ आलेे आहेत.
स्पर्धा होत असलेल्या मॅटभोवती राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. या प्रतिमा म्हणजे स्त्री शक्तीचे प्रतिक आहे. भारतातून आलेल्या प्रत्येक खेळाडूने या स्त्री शक्तीच्या इतिहासाचे अवलोकन करावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.