आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील पहिली खासगी रेल्वे कोईमतूरहून गुरुवारी सकाळी सहाला शिर्डीत पोहोचली. विशेष म्हणजे यात डॉक्टरसह शाकाहारी जेवणाची सुविधा असून रेल्वेतूनच शिर्डीतील निवासाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रवास ३२ तासांत होणार असून ४ तासांचा वेळही वाचणार आहे. पहिल्या खेपेला ८२० साईभक्तांनी याचा लाभ घेतला असून शिर्डीत उतरल्यावर ढोल- ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. भारत गौरव योजनेंतर्गत एम अॅण्ड सी कोईमतूर या कंपनीतर्फे ही ‘साई सदन एक्स्प्रेस’ २ वर्षांसाठी भाडेतत्वावर चालवणार आहे. ही रेल्वे दर मंगळवारी कोईमतूरहून निघून गुरुवारी शिर्डीत पोहचेल. तर शुक्रवारी शिर्डीतून निघून रविवारी कोईमतूरला पोहाेचेल.
सरकारी रेल्वेप्रमाणेच भाडे
नॉन एसी स्लीपर कोच २५००
थर्ड एसी
५०००
सेकंड एसी ७०००
फर्स्ट एसी १००००
येथे असतील थांबे :
-कोईमतूर -तिरपूर -इरोड -सेलमजीरापेट -बंगळुरू -मेलहका -धर्मावरा -मंत्रालयमरोड -वाडा - शिर्डी
या आहेत सुविधा
-२० डबे, १५०० आसन क्षमता
-फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर कोच
-शाकाहारी जेवण, डॉक्टर आणि स्वच्छतेसाठी खास हाउसकिपिंग
-रेल्वे पाेलिस, कॅप्टन, खासगी सुरक्षा.
अवघ्या ३२ तासांत करता येणार प्रवास
^कोईमतूर ते मुंबई रेल्वे प्रवासाला ३८ तास आणि पुढे शिर्डीसाठी ५ तास असे ४३ तास आधी लागत होते. कोईमतूर-पुणे रेल्वेप्रवासासाठी ३२ तास आणि पुढे शिर्डीसाठी ४ तास असे ३६ तास लागत होते. आता कोईमतूर ते शिर्डी प्रवास ३२ तासांत करता येणार आहे.
- प्रसाद अय्यर, संचालक , एम अॅण्ड सी, कोईमतूर
सुखसुविधांबद्दल समाधानी
^रेल्वेतील प्रवास अतिशय सुखद होता. जेवणाची चांगली व्यवस्था होती. स्वच्छतेला महत्त्व दिले आहे.
- महादेश्वरन, प्रवासी, ई रोड, तामिळनाडू
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.