आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:न्यायालयाचे काम चिकित्सालयाप्रमाणेच

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाचे काम हे चिकित्सालया प्रमाणेच आहे. जसे रुग्ण बरे होण्यासाठी चिकित्सालयात येतात तसे पक्षकार न्यायासाठी कोर्टात येतात. येणाऱ्या पक्षकाराचा त्रास कमी करून त्यास मानसिक, आर्थिक सर्वप्रकारचा आधार देऊन न्याय देण्याचे काम न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांचे आहे. कोर्टात काम करताना सर्व न्यायाधीश व वकिलांनी घरी जातांना कोर्टात घडलेल्या सर्व गोष्टी येथेच सोडून शांत डोक्याने घरी जावे, असा सल्ला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिला.

जिल्हा न्यायालयात शहर वकील संघटनेतर्फे जिल्हा न्यायाधीश क्रमांक २ मिलिंद कुर्तडीकर यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करून निरोप देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.अनिल सरोदे व अॅड.अंजली सरोदे यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश कुर्तडीकर व आरती कुर्तडीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथम न्यायदंडाधिकारी सुनील गोसावी यांच्या सह न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, अॅड. संदीप वांढेकर, सचिव अॅड.स्वाती नगरकर, अॅड. अमित सुरपुरिया, महिला सहसचिव अॅड.आरती गर्जे, अॅड. सागर जाधव व विक्रम शिंदे आदी उपस्थित होते.

न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर म्हणाले, घरात वंशपरंपरेने वकिली पेशा आहे. उस्मानाबादपासून सुरु केलेला प्रवास आज नगरमध्ये थांबला आहे. येथे आल्यावर कोरोनाचे संकट आले. या संकटातही कुवतीनुसार न्याय देण्याचे काम केले.

नगरमधील न्यायालयात काम करणाऱ्या न्यायाधीशांची प्रगतीच झाली नगर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साधुसंतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. अशा या नगरमधील न्यायालयात ज्या न्यायाधीशांनी काम केले त्यांची प्रगतीच झाली आहे, असे अॅड. अनिल सरोदे प्रास्ताविकात म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...