आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटे कागदपत्रे तयार:मुलीच्या घराची आईनेच केली परस्पर विक्री

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या नावे असलेल्या घराचे आई व इतर तिघांनी खोटे कागदपत्रे तयार करून घराची परस्पर विक्री केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला आहे. लक्ष्मण विठ्ठल गुंड (वय ४८ रा. माणिकनगर, नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

अनुजा संजय बोरकर (काशिबाई शंकर कडेकर) रा. पौंड रस्ता, पुणे यांनी फिर्याद दिली आहेे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वास भान्सी करत आहेत. या गुन्ह्यात फिर्यादीची आई कमलाबाई शंकर कडेकर, भावजयी सुषमा शामराव कडेकर (दोघी रा. आलमगीर, भिंगार), कुणाल मंत्री (रा. दौंड, पुणे), प्रिन्स हौसिंग सोसायटीचे विसर्जन अधिकारी मेहेर प्रकाश बापु देठे यांचा समावेश आहे. यातील सुषमा कडेकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...