आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्म-मृत्यू नोंदणी व दाखल्यांचे काम सध्या एकाच ठिकाणी सुरू आहे. या कामाचे विकेंद्रीकरण करून शहरातील नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले चारही प्रभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून तांत्रिक पूर्तता होऊनही प्रभाग कार्यालयांकडून जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले देण्याचे काम सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे नागरिकांना उपनगरातून मध्य शहरात हेलपाटे मारावे लागत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या महानगरपालिका कार्यालयातील जन्म व मृत्यू नोंदणी विभागामार्फत जन्माची व मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. दाखल्यांचे वितरणही याच कार्यालयातून केले जाते. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असल्याने नवीन उपनगरांमध्ये वसाहती वाढत आहेत.
जन्म व मृत्यूची नोंदणी व दाखल्यांचे काम एकाच ठिकाणाहून सुरू असल्याने उपनगर परिसरातील नागरिकांना दाखल्यांसाठी जुन्या पालिकेत यावे लागते. नागरिकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी मनपा आयुक्त जावळे यांनी चारही प्रभाग कार्यालयांमार्फत जन्म व मृत्यूची नोंदणी तसेच दाखल्यांचे वितरण सुरू करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.