आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोककळा:गणपत टेकाडेंच्या निधनाने अध्यात्मिक कडी निखळली; गावावर शोककळा

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रम्हलिन नारायणगिरी महाराजांचे निस्स्सिम भक्त. गावातील कोणताही धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमात नेहमी अग्रणी असणारे तसेच सर्वत्र गणपत मामा नावाने परिचित असणारे गणपत टेकाडे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

ज्यावेळी बेलापूरात सन १९६७-६८ ला संत गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह झाला होत. त्यावेळी मामांचा सक्रिय सहभाग होता. तेव्हापासून गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह आणि मामांचा सक्रिय सहभाग हे जणू समिकरणच बनले होते.दरवर्षी सप्ताहसाठी वर्गणी गोळा करणे, गावातून पंगतीसाठी जमवाजमव करणे आदी गोष्टी मनापासून आणि निःस्वार्थ भावाने करायचे. ग्रामदैवत केशव गोविंद महाराज,संत सावता महाराज यांचेवर त्यांची खास श्रध्दा. त्यामुळेच या दोन्ही दैवतांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग असे. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेञातील अखेरची कडी निखळली आहे.त्यांचे मागे मुले,मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...