आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:योग्य उमेदवाराला मतदान केल्यावर होणार शहराचा विकास; महालक्ष्मींच्या देखाव्यातून मतदान जनजागृती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही अमिषाला बळी न पडता चांगल्या उमेदवाराला मतदान केल्यावर शहराचा विकास होऊन कसा कायापालट होईल हे महालक्ष्मींच्या पुढे ‘मतदान माझा अधिकार’ हा देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न रासनेनगर परिसरातील रहिवासी नीलम व साजरी परदेशी यांनी केला आहे.श्रीगणेशाच्या पाठोपाठ शनिवारी घरोघरी महालक्ष्मींचे आगमन झाले. घरोघरी तीन दिवस महालक्ष्मीचे भक्तिभावाने पूजन करण्यात येते. आकर्षक सजावट महालक्ष्मी पूजनाचा महत्त्वाचा भाग असतो. सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे.

शहरातील रासनेनगर परिसरातील परदेशी कुटुंबाने महालक्ष्मींच्या पुढे ‘मतदान माझा अधिकार’ हा प्रबोधनात्मक देखावा सादर केला आहे. या देखाव्यासाठी घरातील वस्तू वापरून ४० छोट्या कापडी बाहुल्या, झोपड्या, फिरते बोर्ड ब फलकांच्या माध्यमातून हा देखावा तयार केला आहे. यात आधार व मतदार नोंदणी, मतदान, मतमोजणी, अपंग मतदारांच्या सोयी आदी प्रक्रिया बाहुल्यांच्या माध्यमातून सादर केल्या आहेत. या देखाव्यात फलक लावून मतदानाविषयी जनजागृती केली आहे. परदेशी कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सवात विविध विषयांवर जनजागृतीचे देखावे सादर करत असतात. महालक्ष्मी नंतरही हा देखावा ठेवण्यात येतो. परिसरातील नागरिक देखावा पाहण्यासाठी गर्दी करत असतात, अशी माहिती राजेश परदेशी यांनी दिली. दरम्यान, सध्या नगर शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यांवरुन चालताना नगरकरांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत, तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचे महापालिकेला काही सोयरसुतक नाही. या पार्श्वभूमीवर परदेशी कुटुंबाने महालक्ष्मीसमोर साकारलेला मतदान जनजागृतीचा देखावा, सर्वांचे आकर्षण ठरत आहे.

बातम्या आणखी आहेत...