आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचे यश:345 शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची होणार तपासणी‎

नगर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत झालेल्या जिल्हांतर्गत‎ बदलीसाठी विशेष संवर्ग एकमध्ये ज्या‎ शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतली.‎ तसेच ज्या शिक्षकांबाबत तक्रारी आल्या‎ आहेत, अशा शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची‎ तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा‎ प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील‎ यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सुमारे ३४५‎ शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची आता‎ फेरतपासणी केली जाणार आहे.‎ जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या‎ शिक्षकांच्या आॅनलाईन बदलीची प्रक्रिया‎ नुकतीच पार पडली. काही संवर्गातील‎ बदल्या होणे अद्याप बाकी आहेत.

बदलीचा‎ लाभ घेण्यासाठी विशेष संवर्ग १ मध्ये सुमारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ३४५ शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर‎ केले होते. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब‎ महापुरे यांनी शिक्षकांनी सादर केलेले‎ प्रमाणपत्र खरे असले, तरी दिव्यांगत्व खरे‎ नसल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.‎ बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करणाऱ्या शिक्षकांचे दिव्यांगत्व तपासणी‎ करण्याच्या मागणीसाठी महापुरे यांनी २८‎ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण‎ सुरू केले. शिक्षण विभागाने महापुरे यांना‎ दिव्यांगत्वाबाबत आक्षेप असलेल्या‎ शिक्षकांची नावे कळवण्याचे पत्र दिले.‎

त्यानंतर महापुरे सुमारे ३४५ शिक्षकांची यादी‎ शिक्षण विभागाकडे सोपवली. त्यावर‎ शिक्षणाधिकारी पाटील यांनी संबंधित‎ शिक्षकांच्या दिव्यांगत्वाच्या तपासणीचे पत्र‎ दिल्यानंतर महापुरे यांनी आंदोलन स्थगित‎ केले.‎ २०१२ नंतर बदल्या पुन्हा वादात‎ जिल्ह्यातील ७६ शिक्षकांनी बदल्या‎ टाळण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर‎ केल्याचा प्रकार जून २०१२ मध्ये उघडकीस‎ आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते.‎ संबंधित शिक्षकांवर कारवाई करून चाैकशी‎ लावली होती. आता पुन्हा १० वर्षांनंतर दिव्यांग‎ प्रमाणपत्र प्रकरण चर्चेत आले आहे. जिल्हा‎ परिषदेचे पुन्हा एकदा या प्रकरणाची‎ चौकशीची तयारी केली आहे.‎

लेखी पत्रात काय म्हटलंय ?
‎७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार विशेष‎ संवर्ग भाग १मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून‎ बदली करून घेतली व त्या शिक्षकांबाबत तक्रारी‎ आल्या आहेत. अशा शिक्षकांच्या कागदपत्रांची‎ पडताळणी करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार‎ सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दिव्यांगत्वाची तपासणी‎ करण्यात येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रात‎ स्पष्ट करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...