आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पॉझिटिव्ह:जिल्ह्यात तीन महिन्यानंतर सर्वाधिक 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ; 21 मार्चला 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व जिल्ह्यात तीन महिन्यानंतर सर्वाधिक १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत. सर्वाधिक नगर शहरात नवे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. नगरमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. गेल्या तीन महिन्यापासून नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने घटत होते. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासह सर्व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली होती. गुरुवारी (९ जून) तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात आढळून आले आहे. यात नगर शहरात ५, कर्जत २, पारनेर २, राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्यात प्रत्येकी १ व अन्य जिल्ह्यातील २ असे १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. फेब्रुवारी महिन्यात दैनंदिन ४०० ते १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. मार्च महिन्यापासून मात्र रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती. २२ मार्चला ७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. २१ मार्चला १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.

बातम्या आणखी आहेत...