आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकारमानाने मोठा आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येतो, जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही आपली पूर्वीही भूमिका होती आणि आजही आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले. आमदार शिंदे यांची भाजप प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा भाजपतर्फे त्यांचा बाजार समितीमधील शेतकरी भवनमध्ये सत्कार करण्यात आला .
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, मिलिंद गंधे,अश्विनी थोरात, सुजित झावरे, सुरेश सुंभे, मनोज कोकाटे, अभिलाष घिगे, विलास शिंदे, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, भाऊसाहेब बोठे, अशोक झरेकर उपस्थित होते.
माजी आमदार कर्डिले यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला त्यावर आपल्या भाषणात उत्तर देताना आमदार शिंदे म्हणाले, मी पालकमंत्री असल्यापासून जिल्हा विभाजनाची भूमिका घेतलेली आहे आणि आजही त्या भूमिकेवर कायम आहे. चार- चार आमदार असणाऱ्या कोकणातील जिल्ह्यांना स्वतंत्र अधिकारी आहेत. पण अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकाराने सर्वात मोठा आहे. जिल्ह्यात दोन खासदार आहेत. त्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण येतो. त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण अनुकूल आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यात जिल्ह्याला किमान दोन मंत्रिपदे मिळावेत, यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषदेचा आमदार झालो कामे करूनही आमदार शिंदे, माजी आमदार औटी, आणि मी पडलो त्यामुळे लोकांना नक्की काय हवे असते ते समजत नाही असे माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले. त्याविषयी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, मी मतदार संघात खूप कामे केली. पुस्तक वाचून, कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कॉपी करून आमदार होता येत नाही. पण कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पुन्हा आमदार झालो. खरं तर राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषद आमदार झालो, असे सांगताना ते भावुक झाले होते .
राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषदेचा आमदार झालो कामे करूनही आमदार शिंदे, माजी आमदार औटी, आणि मी पडलो त्यामुळे लोकांना नक्की काय हवे असते ते समजत नाही असे माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले. त्याविषयी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, मी मतदार संघात खूप कामे केली. पुस्तक वाचून, कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कॉपी करून आमदार होता येत नाही. पण कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पुन्हा आमदार झालो. खरं तर राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषद आमदार झालो, असे सांगताना ते भावुक झाले होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.