आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक कारखान्याच्या कार्यक्षेञातील शिल्लक उसाचा प्रश्न उभा ठाकला असून कोणत्याही परिस्थितीत इतर कारखान्याच्या मदतीने शिल्लक उसाचे गाळप करणे आवश्यक आहे. संपूर्ण गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत तसेच याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले. अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाचे गाळप प्रश्नी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अशोक कारखाना येथे कारखाना व्यवस्थापन संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. या बेठकीस प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, भूमिलेख अधीक्षक इंदलकर, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. माणिक धुमाळ यांचेसह कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक मंडाळाचे सदस्य कोंडीराम उंडे,
सोपानराव राऊत, हिंमतराव धुमाळ, सिध्दार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, आदिनाथ झुराळे, पुंजाहरी शिंदे, विरेश गलांडे, अमोल कोकणे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कार्यक्षेत्रातील शिल्लक उसाचा तपशील घेतला. तसेच ऊस तोडणी व गळिताबाबतचा सविस्तर आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत शिल्लक उसाचे गाळप करणे आवश्यक असून त्याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले. यासाठी बाहेरून हार्वेस्टर आणून ऊस तोडणी केली जात आहे. खासगी गाव टोळ्यांमार्फतही ऊस तोडणी होत आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करण्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आढावा बैठकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस तोडणी सुरू असलेल्या काही स्थळांना समक्ष भेट देऊन पाहाणी केली. यानंतर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंडलाधिकारी बोरुडे, तलाठी सोनवणे, विक्रांत भागवत, अण्णासाहेब वाकडे, शिवाजी मुठे, रमेश आढाव, बाबासाहेब तांबे, भिकचंद मुठे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.