आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:शेतकऱ्याचा मुलगा बनला झाला सहाय्यक अभियंता; बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आकाश पानसरे यांचा सत्कार

पिंपरणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाचा ठाम निश्चय, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते.जाखुरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आकाश हौशीराम पानसरे या तरुणाने हे सिद्ध करून दाखवून दिले.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी एमपीएससी परीक्षेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रात ओबीसीमध्ये सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता संमारंभ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आकाश पानसरे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीरजी तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, जयश्रीताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, इंद्रजीतभाऊ थोरात, माधवराव कानवडे, नवनाथ आरगडे आदी सह जाखुरी गावचे उपसरपंच राजेंद्र पानसरे ,राजेंद्र देशमुख ,हौशीराम पानसरे, दत्तात्रय पानसरे दशरथ देशमुख, बाळासाहेब पानसरे, राजेंद्र पानसरे, लक्ष्मण पानसरे, शांप्रोचे संचालक बाळासाहेब राहणे, पोलिस पाटील शिवाजी पानसरे ,ग्रा प सदस्य प्रभाकर बागुल, चंद्रकला भालेराव,अनिता राहणे या सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

आकाशने कुटुंबियांसह गावाचे नाव उंचावले
शेतकऱ्याचा मुलगा ते बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता अशी मजल मारून आकाशने कुटुंबियांचेच नव्हे तर जाखुरी गावचे नावदेखील त्याने उंचावले.'' बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री.

बातम्या आणखी आहेत...