आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर फेस्टिव्हल:जनमनाचा महोत्सव उत्तरोत्तर असाच उंचावत राहील ; तांबे

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर शहराचा समावेश पुढारलेल्या शहरांमध्ये होतो. ज्या पद्धतीने शहराने भौतिक प्रगती साधली आहे, त्याप्रमाणे शहराने सांस्कृतिक, कला, साहित्य व क्रीडा क्षेत्रातही मैलाचा दगड ओलांडला आहे. सर्वच क्षेत्रात संगमनेर आघाडीवर राहिले असून सांस्कृतिक क्षेत्रात शहराचे मोठे योगदान आहे. संगमनेर फेस्टिव्हलने शहराच्या वैभवात आणखी भर घातली आहे. जनमनाचा हा महोत्सव उत्तरोत्तर असाच उंचावत राहील, अशी अपेक्षा सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारे सुरु असलेल्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये सोमवारी मराठी रंगभूमिवर तुफान गाजत असलेले ‘मोरुची मावशी’ हे विनोदी नाटक सादर झाले. या प्रसंगी तांबे बोलत होते. फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी व कोषाध्यक्ष उमेश कासट उपस्थित होते.

क्षणाक्षणाला उडणारे हास्याचे कारंजे आणि त्याला मिळत गेलेली टाळ्यांची जोड यातून सोमवारी संगमनेर फेस्टिव्हलच्या प्रांगणात मनोरंजनाची धमाल उडाली. गेल्या सहा दशकांपासून मराठी रंगभूमीवर तुफान गाजत असलेल्या आणि दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेने अजरामर झालेल्या ‘मोरुची मावशी’ या तुफान विनोदी नाटकाने संगमनेरकरांची हसवून हसवून पुरती वाट लावली. अभिनेता भरत जाधव यांनी साकारलेल्या मावशीच्या भूमिकेने रसिक बेभान झाले.

‘मोरुची मावशी’ या नाटकातील मावशीची भूमिका अभिनेते भरत जाधव यांनी हुबेहूब वठवली. नेमकी वेशभूषा, प्रासंगिक नेपथ्य आणि नाटकातील प्रत्येक कलाकाराने वठवलेली भूमिका व संवादामुळे अडीच तास रसिक खुर्चीला खिळून बसले होते. मावशीच्या भूमिकेतील भरत जाधव यांनी टांग टिंग टिंगा या गाण्यावर घातलेला पिंगा संगमनेरकरांना भलताच भावला. जयराज नायर, प्रदीप वेंगुर्लेकर, उमेश बने, विनम्र भाबल, प्रशांत विचारे, गौरी फणसे, गौरी जागळेकर, अंजली मायदेव व रुही तारु या सहाय्यक कलाकारांनीही या नाटकातील आपापली भूमिका चोखपणे वठवताना रसिकांची दाद मिळवली.

बातम्या आणखी आहेत...