आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व गुणसंपन्नता, संपत्ती यांचा त्याग करून कल्याणी बोरा यांनी एक वर्षांपूर्वी आत्मकल्याण व जनकल्याण हेतूने जैन संयम दीक्षा अंगीकार केली. त्या आता साध्वी बनल्या आहेत. त्यांचा दीक्षा प्रथम वर्षपूर्ती सोहळा राहाता येथील जैन संघाच्या तत्त्वावधानात गुरुमाता साध्वी अक्षयश्री, साध्वी संसिद्धी, साध्वी विभवश्री यांच्या उपस्थितीत आनंदात संपन्न झाला.
वडगाव शेरी येथील शांतीलाल बोरा यांच्या नात व अतुल बोरा यांच्या कन्या कल्याणी यांनी जैन धर्मातील अभ्यास करून एका वर्षापूर्वी साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. साध्वी संयमश्री यांना एक वर्षपूर्ती निमित्ताने शुभेच्छा देताना साध्वी संसिद्धी व ध्यानसिधी साध्वी अक्षयश्री यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या साधकाचे गुण उपस्थितांसमोर प्रगट केले. वडगाव शेरी संघाचे अध्यक्ष शांतीलाल बोरा यांनी परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राहाता येथील जैन समाजाच्या बहुमंडळाने साध्वी संयमश्री यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. याप्रसंगी साध्वी संयमश्री यांनी आपण समाधानी असून विनय व विवेक पूर्ण जीवन कसे जगावे, याचे धडे मला गुरुमातेच्या सानिध्यात मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी राहाता संघपती अनिलकुमार बाबूलाल पिपाडा तसेच राहाता साकुरी येथील अनेक मान्यवरांनी साध्वी संयमश्री यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.