आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्व:मतदार नोंदणीत पदवीधरांना पहिल्यांदा आले एवढे महत्त्व

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचे करण्याचे आदेश दिल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीत प्रस्थापित नेते उतरल्याने नावनोंदणीसाठी महत्त्व आले. पदवीधरांचा शोध घेऊन अर्ज भरून घेतले जात आहेत.

मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, तर भाजपकडून डॉ. राजेंद्र विखे यांची उमेदवारी घोषित केली आहे. या नोंदणी मोहिमेसाठी दोन्हीही पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. विविध यंत्रणांच्या माध्यमातून पदवीधरांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे एकेका पदवीधरांना दोन दोन, तीन तीन अर्ज द्यावे लागले आहे. काँग्रेसचे उमेदवार डाॅ. सुधीर तांबे यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दोनदा विजय मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात ठेवला. त्यांनी यापूर्वीच मतदारसंघात दौरा केला आहे.

तर आता डॉ. विखे यांच्याही भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत दोघांमध्ये चांगला सामना रंगणार असून कोण बाजीगर ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मागील वेळी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी होती. काँग्रेसने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना, तर भाजपने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंचे जावई डॉ. प्रशांत पाटील यांना मैदानात उतरविले होते. काँग्रेसला ४० हजारांहून अधिकच्या फरकाने या मतदारसंघात विजयी हॅट््ट्रीक साधता आली होती.

श्रीरामपूर तालुक्यात ११४४ पदवीधर मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाले असून ८५४ अर्जाची डेटा एन्ट्री झाले आहेत. तर जिल्ह्यात १२ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर ४३३ अर्ज अपात्र झाले आहेत. तालुक्यात ६७२ व १८२ पुरुष अर्ज प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...