आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जातीपातीपलीकडे जात सत्याच्या बाजूने संशोधन करून क्रांतीची ज्योत पेटवावी; साहित्यिक समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे संशोधकांना आवाहन

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा व संकृतीचे उत्थान करण्यासाठी विद्यावाचस्पती कार्याभ्यास हा संशोधनात्मक उपक्रम महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम संशोधनाची दिशा निश्चित करून समाजरचनेची उतरण टिकवणारे संशोधन सुरु करावे. संशोधकांनी जातीपातीच्या पलीकडे जात सत्याच्या बाजूने संशोधन करून तुम्ही क्रांतीची ज्योत पेटवू शकता, असे मार्गदर्शन साहित्यिक समीक्षक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.

पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या विद्यावाचस्पती कार्याभ्यास (पीएचडी.कोर्सवर्क २०२२) कोर्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. ३१ मे पर्यंत चालणाऱ्या या मार्गदर्शक कोर्सचे उद्घाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक होते. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, ब्रिजलाल सारडा, डॉ. संदीप सांगळे, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे, प्रा.डॉ.महेश्वरी गावित, डॉ. प्रतिक्षा गायकवाड, प्रबंधक अशोक असेरी आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. लांडगे म्हणाले, २०२० मध्ये विद्यावाचस्पती कार्याभ्यास हा अभ्यासक्रम तयार केल्यानंतर प्रथमच ऑफलाइन कार्यशाळा सारडा महाविद्यालयात होत आहे. पीएचडी करताना छोटे छोटे कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. त्यामुळे या कोसर्मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी भाग्यवान आहेत.प्रास्ताविक मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ.महेश्वरी गावित यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता कुलकर्णी व राजेंद्र जाधव यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...