आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञता दिवस:पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला; आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन, शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन, सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन करुन दुर्बल घटकांना त्यांनी सर्वप्रथम आरक्षण दिले. पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला. शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेतल्यास सामाजिक परिवर्तन घडेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, सरचिटणीस गणेश बोरुडे, अजय दिघे, अमोल बोरुडे, लहू कराळे, डॉ. बाबासाहेब कडूस, प्रसाद कर्डिले, विशाल म्हस्के, सद्दाम शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.

प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवव्याख्याती प्रणाली कडूस या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास आपल्या भाषणातून मांडला. शाहू महाराजांच्या स्मृतीदिनाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन यावेळी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...