आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:युवा पिढीवर देशाचे भवितव्य अवलंबून; शेवगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयात न्याधीश एस. यू. जागुष्टे यांचे मत

शेवगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या युवा पिढीवरच देशाचे भवितव्य घडत असते. युवा पिढीला देशाची सामाजिक, नैतिकतेची जाणीव करून देऊन योग्य मार्गदर्शन मिळाल्यास देशाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही, असे न्यायाधीश एस. यू. जागुष्टे यांनी सांगितले.आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव येथे तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ शेवगाव याच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी कायदेविषयक शिबिर पार पडले. या कार्यक्रमामध्ये अँटी रॅगिंग कायदा, ट्रॅफिक नियम, तसेच जागतिक युवा दिवस या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ट्रॅफिक नियम या विषयावर बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष कारभारी गलांडे म्हणाले, मद्यपान करून गाडी चालवणे व गाडीचा अतिवेग यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.या दोन गोष्टीमुळे काही वाहनवाल्याची चूक नसताना देखील त्यांचे बळी पडल्याचे चित्र आपण समाजात पाहत आहोत.अँटी रॅगिंग कायदा याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. आर शिंदे यांनी मार्गर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश एस. यू. जागुष्टे, सहदिवाणी न्यायाधीश व्ही. बी. डोंबे, वकील संघाचं अध्यक्ष के. के. गलांडे, बी. आर शिंदे, महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. युवराज नरवडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. शिंदे होते. सूत्रसंचालन डॉ. सचिन दुकळे यांनी केले. आभार डॉ. नारायण भालसिंग यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...