आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअस्मानी संकटांमुळे बळीराजा आधीच कर्जाच्या खाईत लोटला गेलेला असताना, विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना १०१ च्या नोटिसा बजावत आहेत. हा खेळ त्वरित बंद करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यास जिल्हा सहकारी बँकच जबाबदार असेल, असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेवासा तालुका प्रमुख सुरेशराव डिके यांनी दिला आहे.
जिल्हा बँकेच्या सुलतानी वसुलीबाबत आपण खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचेही डिके यांनी सांगितले. कर्जबाजारी शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, तसेच जिल्हा बँकेने हा खेळ बंद करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यास जिल्हा बँकेला जबाबदार धरणार आहोत. भेंडा येथे तरुण शेतकरी रावसाहेब दगडू नवले याने नुकतीच अस्मानी संकटाला वैतागून आत्महत्या केली.
मात्र, त्यानंतरही सहकारी सोसायट्या व जिल्हा बँका शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वसुलीसाठी १०१ च्या नोटिसा बजावून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. नोटिसांचा हा खेळ त्वरित थांबवावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्यास जिल्हा बँकाच जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी डिके यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.