आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभगवंतांचे नामसमरण हे मनुष्याला तारक आहे,तसेच गोपाल काला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समुच्चय ''काला'' म्हणजे त्या काळाला त्या स्थळाला त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण होय. भगवंताच्या नामसमरणाचा महिमा हा मनुष्य देहाला आणि कर्माला तारणारा आहे, असे निरुपण संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी केले. राशीन येथील संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संस्थेच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी गोसावी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
त्यावेळी ते बाेलत किर्तानासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहानिमित्त गेल्या सात दिवसात दैनंदिन हरिनामाचा कार्यक्रम पार पडले. मंगळवारी सायंकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथ सोहळ्याचे पारायण पूर्ण होऊन ग्रंथाची नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. बुधवारी सकाळी काल्याचे कीर्तन झाले. अनंत नामाचा हा काला । पुराणे म्हणते पाहू चला ।। या अभंगाचे निरूपण करताना योगीराज महाराज गोसावी म्हणाले, गोपालकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पुर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो. सांप्रदायातील संतांचे विचार हे आपल्या शरीरातील षटविकारांचे नाश करू शकतात, म्हणून मानवाने भगवंतांचे नाम स्मरण केले पाहिजे, या जन्मीचे कर्म चांगले व्हावे, असे वाटत असेल तर परमार्थात नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे गोसावी म्हणाले. काल्याच्या कीर्तना नंतर राऊत व विसापुरे यांनी महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले.
देवीचे मंदिर राज्यात प्रसिद्ध
राशिनचे श्री जगदंबा देवी मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. या मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संस्था व ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेशवरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.