आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण क्षेत्र व्यापक आहे. समाजाला किंवा देशाला बलवान बनवायचे असेल तर शिक्षणासारखे प्रभावी माध्यम दुसरे नाही. वर्ग खोल्यांमध्ये राष्ट्राचे भवितव्य घडत असते. असे पंडित नेहरू नेहमी म्हणत. शिक्षणक्षेत्र जेवढे प्रभावी तेवढे राष्ट्राची प्रगती होते. जागतिक दर्जाचे शिक्षण क्षेत्र तयार करणे ह आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
हिंदसेवा मंडळाची प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीए अशोक गुर्जर हे होते. याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, उपकार्याध्यक्ष डाॅ.पारस कोठारी, सीताराम सारडा शाळेचे चेअरमन प्रा.मकरंद खेर,दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, संस्थेचे पदाधिकारी अशोक उपाध्ये, विष्णू सारडा, सतीश बुब, दिलीप शहा, रणजीत श्रीगोड, कल्याण लकडे, नवनाथ जंगले, आदिक जोशी, योगेश देशमुख, मुख्याध्यापक गोपाळे, शालेय समिती सदस्य अनंत देसाई, सचिन चोपडा, विजया निसळ,रवींद्र गुजराती आदी उपस्थित होते.प्रास्ताविक शालेय समितीचे चेअरमन मधुसूदन सारडा यांनी केले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणारी बहुदा ही महाराष्ट्रातील पहिली शाळा आहे.तसे पाहिले तर पदवीधर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार असतो. परंतु या शाळेतील विद्यार्थी पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. सूत्रसंचालन गौरी ब्रह्मे यांनी, तर आभार विद्या पोतदार यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.