आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोग‎ महाराज पुण्यतिथी उत्सव:दशरथे महाराजांच्या कीर्तनाने‎ सुवर्ण महोत्सवाची सांगता‎

कोपरगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हिंगणी येथे जोग‎ महाराज पुण्यतिथी उत्सव व योगीराज‎ तुकाराम बाबा पुण्यतिथी सुवर्ण उत्सव‎ सोहळाची सांगता सोमवारी उमेश‎ महाराज दशरथे यांच्या काल्याच्या‎ कीर्तनाने झाली.‎ योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे‎ अध्यक्ष रघुनाथ महाराज खटाणे‎ त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम‎ सुरू होता. योगीराज तुकाराम बाबा‎ संस्थांनचे अध्यक्ष रघुनाथ महाराज‎ खटाणे यांच्या हस्ते दशरथे महाराज‎ यांचा सत्कार करण्यात आला.‎

मुदंगाचार्य मंगेश महाराज जाधव,‎ विठ्ठल महाराज,मनोहर महाराज, नंदू‎ महाराज, रामेश्वर महाराज‎ घुंमरे,मनसुक महाराज दहे, वैष्णव‎ महाराज जाधव, संजय नवगिरे, विठ्ठल‎ शेलार,रवि चव्हाण, आचारी मुरली‎ गणेश अंकीत ,गोरख दहे ,आबा‎ पवार, कोपरगाव तालुका पोलिस‎ स्टेशनचे अधिकारी, अक्षय दहे‎ आदींचा सत्कार करण्यात आला.‎ ४०० महिला व पुरुष भाविक‎ तुकाराम महाराज गाथा पारायणासाठी‎ बसलेले होते. महाराष्टातील नामवंत‎ कीर्तनकार महाराजांचे कीर्तन या‎ कार्यक्रमात झाले. गाथा पारायणाची‎ सांगता योगीराज तुकाराम बाबा यांच्या‎ मिरवणुकीने करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...