आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार वाऱ्यावर:सरकार बदललं पण कामगार कल्याण मंडळाचे संचालक मंडळ मात्र बदलेना; कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाची मुदत वर्षभरापूर्वीच संपली

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप-शिवसेना युतीचं सरकार बदललं. महाविकास आघाडीचे सरकार आलं. पण कामगार कल्याण मंडळाच्या संचालक मंडळावर संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारला वेळ मिळेना. गतवर्षी मे महिन्यात भाजप-सेना युतीच्या कार्यकाळात असलेल्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. वर्ष उलटून गेले तरी अद्याप नवे संचालक मंडळ स्थापन झाले नाही.

महाराष्ट्रात कामगार कल्याण मंडळाची स्थापना २०११ मध्ये झाली होती. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राज्यात होती. त्यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे सलग तीन वर्षे अध्यक्ष होते. २०१४ मध्ये भास्कर जाधव हे अध्यक्ष झाले. २०१५ मध्ये युतीच्या काळात प्रकाश मेहता यांच्याकडे अध्यक्षपद गेले. त्यानंतर मेहता यांना हटवून युती सरकारने मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन ओमप्रकाश यादव यांची नियुक्ती केली.

२०१७ मध्ये युती सरकारच्या कालावधीत यादव यांना बाजूला करून तत्कालीन कामगार मंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे अध्यक्षपद दिले. एकूण ११ जणांच्या संचालक मंडळात तीन मालक प्रतिनिधी, तीन कामगार प्रतिनिधी, तीन सरकारचे प्रतिनिधी, अध्यक्ष व सचिव असे होते. या मंडळाची मुदत २०१५ ते २०२० पर्यंत होती. गेल्यावर्षी मे महिन्यात या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. वर्ष झाले तरी कामगार कल्याण मंडळावर नवे संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले नाही.

बातम्या आणखी आहेत...