आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Government Of The Present Is A Form Of Self sacrifice For Others; Former Minister Dhananjay Munde Criticizes Bharatiya Janata Party In Wambori| Marathi News

राजकारण:दुसऱ्यासाठी स्वत:ची जिरवण्याचा प्रकार म्हणजे आताचे सरकार; माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वांबोरी येथे भारतीय जनता पक्षावर टीका

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार तुम्ही पाडले, पण पाडूनही तुम्हाला मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे. दुसऱ्याची जिरवण्यासाठी स्वतःची जिरली, तरी चालेल असा प्रकार म्हणजे आताचे सरकार असा टोला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला.राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत ४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन काही दिवसापूर्वी भाजपने केले होते.

याच योजनेचे दुसरे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या वतीने माजी मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, माजी सरपंच नितीन बाफना किसन जवरे, कृष्णा पटारे, उद्योजक संतोष कांबळे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, प्रशांत नवले, एकनाथ ढवळे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री मुंडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडले, पण त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही किती वाईट परिस्थिती आहे.माणसं फोडून, सुरत मार्गे गोव्हाटी, गोव्हाटीहून गोवा आणि पुन्हा मुंबईत आणली तरी भाजपला मुख्यमंत्री पदावर बसता आले नाही अशी खील्ली मुंडे यांनी उडवली. दुसऱ्याची तरी जिरवण्यासाठी स्वतःची जिरली तरी चालेल तो प्रकार म्हणजे आत्ताच सरकार आहे, असेही मुंडे म्हणाले. दरम्यान, भिटे बोलत असतानाच किरकोळ गोंधळ झाला.

खासदार विखेंना टोला
खासदारांची ऐपत मोठी आहे, आता महसूल मंत्री पद मिळाले. हे पद चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना मिळाले नाही. एवढे जर तुमचे संबंध आहेत तर या योजनेचे श्रेय न घेता, हजार ते दोन हजार कोटींचा प्रकल्प आणून मग श्रेय घ्या, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला.

‘त्यांनी’ मुलाला हे धंदे शिकवले का ?
मुलं वडिलांना धंदा शिकवत नसतात, पण वडील मुलाला धंदा शिकवतात. मग यांनी त्यांच्या मुलाला गावातील जमिनी विकायच्या ? डेअरीच्या जमिनी विकायचे शिकवले का ? पतसंस्थेतील ठेवी परत न केल्याने अनेकांचे विवाह थांबले, असा टोला माजी जि. प. अध्यक्ष भिटे यांनी विरोधकांना लगावला.

माईक ओढल्यानंतर तणाव
माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचे भाषण सुरू असतानाच एका तरूणाने माईक हिसकावल्यामुळे भरसभेत तणाव निर्माण झाला. त्यानंतर माईक हिसकावणाऱ्या तरूणाची धुलाई केली. सभेसाठी बंदोबस्त असताना घडलेली घटना तालुक्यात चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली.

‘त्यांनी’ ऐकावं अन्यथा नीट कसं करायचं ते पाहू...
यापूर्वी वांबोरीत जे चालायचे ते आता चालणार नाही. आता ऐकायला कटू वाटत असले तरी ते ऐकावं लागेल, ज्यांना सहन होत नसेल तर त्यांना कस नीट करायचं ते आम्हाला माहित आहे, असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विरोधकांना नाव न घेता लगावला.

बातम्या आणखी आहेत...