आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत ज्यांच्याबद्दल वाईट बोलतात, ते मोठे होत आहेत. त्यामुळे त्यांनी असे बोलत राहावे, आम्ही आमचे काम करत राहणार असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत लगावला.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सकाळी शिर्डी येथे साईसमाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, मविआच्या कालच्या मोर्चाला उद्धव ठाकरे यांचे सर्व कुटुंब रस्त्यावर उतरले, ही चांगली बाब आहे. मात्र लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची जेव्हा संधी होती, तेव्हा उतरणे अपेक्षीत होते.
कर्नाटक सिमाप्रश्नाबाबत बोलताना, काही चूकीचे घडत असेल तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचे त्यांनी सांगितले. श्री साईबाबांचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात यावा या ताराचंद कोते यांच्या मागणीवर बोलतांना केसरकर म्हणाले, शालेय शिक्षणाचा अभ्यासक्रम मंडळ ठरवत असते. आपण केलेल्या सुचना शालेय शिक्षण मंडळांमध्ये मांडणार अशी ग्वाही दिली.
सर्वधर्म समभावाची सर्वात अगोदर शिकवण श्री साईबाबांनी दिली. महाराष्ट्रात ज्यावेळी हिंदू मुस्लिम यांच्यात वैमनस्य निर्माण होत होते. त्याकाळात सर्वांना एकत्र ठेवण्याचे महान काम साईबाबांनी केले आहे. शिर्डी शहरातील हॉटेल व्यावसायिक व कर्मचाऱ्यांकडून येथे येणाऱ्या भाविकांना आदरतिथ्य वागणुक मिळावी यासाठी कार्यशाळा घेऊ असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
चुका करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल
केंद्रिय गृहमंत्र्याच्या बैठकीत जे घडले, त्याच्या विपरीत जर त्यांनी काही केले तर त्याची तक्रार केंद्राकडे केली जाईल. त्यांना चुका करायच्या असतील तर करुद्या, त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. मात्र, आपण चुका करता कामा नये असेही केसकर यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद प्रश्नी बोलताना स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.