आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारवर कुरघोडी:नगर अग्निकांड प्रकरणी राज्यपालांनी विशेषाधिकार वापरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन केले रद्द

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेले तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष अधिकार वापरून रद्द केले. त्यांना शिरूर (जि. पुणे) येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबर रोजी आग लागून १४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर आघाडी सरकारने डॉ. पोखरणा यांना निलंबित केले होते. त्यावर राज्यपालांनी विशेषाधिकाराचा वापर करून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले, असे या आदेशात नमूद करण्यात आले. ‘गोपनीय’ असा उल्लेख असलेला हा आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी वैभव ग. कोष्टी यांच्या स्वाक्षरीने पारित करण्यात आला. यामुळे राज्यपालांनी आघाडी सरकावर कुरघोडी केल्याचे सांगितले जात आहे. एकूणच राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...