आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक‎:चिमुकल्यांच्या प्रात्यक्षिकांचे‎ पाहुण्यांनी केले कौतुक‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त‎ सावेडीतील पाईपलाईन रोड वरील‎ श्री रेणुका माता मंदिरा मागे‎ असलेल्य वंडर्स किड्स स्कूलमध्ये‎ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.‎ चिमुकल्या विद्यार्थांनी मानवी‎ शरीराचे अवयव, दिवस आणि रात्र,‎ ग्रहमाला, पाण्याचे उपलब्ध स्रोत,‎ सौर ऊर्जा या विषयावर आधारित‎ अभ्यासपूर्ण आणि सुंदर अशी‎ प्रात्यक्षिके सादर केली उपस्थित‎ पाहुणे तसेच पालकांनी या‎ प्रात्यक्षिकांचे कौतुक केले.‎ सर्व लहान मुलांना विज्ञान‎ विषयाची आवड निर्माण व्हावी,‎ म्हणून स्कूलमध्ये असे विविध‎ उपक्रम राबविले जातात.

मुलांच्या‎ या उपक्रमात सर्व शिक्षकांसोबत‎ त्यांच्या पालकांनीही त्यांना‎ प्रात्यक्षिके तयार करण्यासाठी मदत‎ केली. यावेळी तृप्ती कर्णावट,‎ सुजाता तुवर, यांच्या हस्ते फित‎ कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन‎ करण्यात आले. पोर्णिमा मुंगसे,‎ संचालिका वैशाली जाधव, आशा‎ जाधव, अविनाश जाधव, मोनिका‎ दार्वेकर आदी शिक्षक, पालक‎ उपस्थित होते. मुलांच्या‎ कलागुणांना चांगला वाव मिळावा‎ त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत‎ व्हावा यासाठी शाळेने आयोजित‎ केलेल्या अशा उपक्रमांची‎ पालकांनी तोंड भरून स्तुती केली.‎ वैशाली जाधव यांनी सर्वांचे स्वागत‎ केले. सुजाता तुवर यांनी आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...