आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षच ‘कोंडवाड्या’त; उष्माघात कक्ष सुरू, पण पंधरा दिवसांत एकही रुग्ण दाखल नाही, जिल्ह्याच्या तापमानात मात्र घट

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उष्णतेचा कडाका वाढल्याने नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला, पण या कक्षाची अवस्था ही कोंडवाड्यासारखी असल्याचे दिसून आले. या कक्षात दोन कुलर लावण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत एकही रुग्ण या कक्षात दाखल झालेला नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उच्चांकी तापमान नगरमध्ये नोंदवल्यानंतर आता मात्र काही अंशी तापमानात घट झाली आहे.

मार्च महिन्यापासून शहरात उन्हाचा कडाका वाढू लागला होता. एप्रिलच्या पंधरवाड्यापासून त्यात मोठी वाढ झाली होती. गेल्या नऊ वर्षांत प्रथमच गेल्या गुरुवारी नगरचे तापमान ४४.५ अंशावर गेले होते. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्मघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्यासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे. मात्र या उष्मघात कक्षाची अवस्था ही कोंडवाड्यासारखी झाली आहे.

सर्वसामान्य रुग्णांना दाखल करण्यासाठी असलेल्या वार्डातील एका खोलीत हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. तेथे दोन कुलरची व्यवस्था आहे. या कक्षाची जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, डॉ,कटारिया यांनी पाहणी केली. त्यानंतर संबधित कक्ष प्रमुखांना सूचना दिल्या. कक्ष सुरु झाला असला तरी या कक्षात अद्यापि एकही रुग्ण उपचारासाठी दाखल झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...