आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरच्या तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्याने पाडव्याच्या सणापूर्वीच नगरकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गुरुवारी उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील बाजारपेठेत देखील शुकशुकाट होता. मंगळवारी नगरचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. बुधवारी देखील त्यात वाढ झाली होती. गुरुवारी तीव्रता आणखी वाढली.
गेल्या दहा दिवसांपुर्वी ढगाळ व काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले होते. आता गेल्या चार दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. मंगळवारपासून नगरच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी नगरचे तापमान ४०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. दोन दिवसांपासून त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तापमानात अचानकपणे वाढ झाल्याने थंड पेयांना देखील मागणी वाढली आहे. उन्हामुळे ठिकठिकाणी रसवंतीगृहे, लस्सी, ताक विक्री, लिंबू शरबतची दुकाने दिसू लागली आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे नगर शहरातील बाजारपेठेत गुरुवारी शुकशुकाट होता. रस्त्यावर देखील तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती. दरवषी पाडव्याच्या सणानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. यंदा मात्र होळी सणाच्या अगोदरपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने ठिकठिकाणी माठ विक्रीची दुकाने थाटू लागली आहेत. त्याचबरोबर टोप्या, गॉगलची देखील मागणी वाढू लागली आहे.
साथीच्या आजारातही वाढ
नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या एकीकडे कमी होत असताना दुसरीकडे अचानकपणे उन्हाच्या तीव्रता वाढल्याने साथीच्या आजारात देखील काहीशी वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, तापीचे रुग्ण सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येताना दिसत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.