आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Highest 32 TMC Water Storage In April For The First Time In Five Years; For The Second Year In A Row, There Is No Shortage Of Water, The Problem Of Irrigation Of 47 Thousand 298 Hectares In The District Has Been Solved | Marathi News

दिलासा:पाच वर्षांत प्रथमच एप्रिलमध्ये सर्वाधिक 32 टीएमसी जलसाठा; सलग दुसऱ्या वर्षी टंचाईच्या झळा नाहीत, जिल्ह्यातील 47 हजार 298 हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटला

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलासा

पाच वर्षांत प्रथमच एप्रिलमध्ये सर्वाधिक ३२ टीएमसी जलसाठा; सलग दुसऱ्या वर्षी टंचाईच्या झळा नाहीत, जिल्ह्यातील ४७ हजार २९८ हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटला

दीपक कांबळे | नगर

जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहिली. लहान मोठ्या प्रकल्प अजूनही पाणीदार आहेत. मागील पाच वर्षांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ९ धरणांमध्ये सर्वाधिक सुमारे ३२ टीएमसीचा जलसाठा असल्याची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४७ हजार २९८ हेक्टर शेती सिंचन क्षेत्राला ऐन उन्हाळ्यातही लाभ होणार आहे.

जिल्ह्यात भंडारदार, मुळा, निळवंडे, ओझर वेअर हे मोठे प्रकल्प, तर आढळा, मांडओहळ, घा. पारगाव, सीना, खैरी, विसापूर हे मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला असून शेती सिंचनासह बिगर सिंचनासाठी आवश्यक पाण्याची चिंता मिटली आहे. मोठ्या प्रकल्पातील मुळा धरणांत एप्रिल २०१९ मध्ये अवघा दीड टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. हे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यावेळी जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. परंतु, २०२० ते २०२१ या वर्षांत दमदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले. सद्यस्थितीत मुळा धरणातून १६५२ क्युसेक्स वेगाने उजवा, तर ९३० क्युसेक्स वेगाने डाव्या कालव्यातून आवर्तन दिले जात आहे. त्याबरोबरच वांबोरी चारीचेही आवर्तन सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले. सीना, खैरी, सापूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत सुमारे अडीच टीएमसी पाणी आहे. जिल्ह्याचे चित्र पाणीदार असल्याने, आता उन्हाळी आवर्तनाचे नियोजन प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.

एकट्या मुळा धरणातून वर्षभरामध्ये होतेय १ हजार ४५० दलघफू पाण्याची वाफ

५ वर्षांत प्रथमच जलसाठा कसा राहिला?
यंदा सरासरी १२६ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे धरणातून पाणी उपसा कमी राहिला. जिल्ह्यातील लहान प्रकल्प व तलावात एप्रिलमध्येही भरपूर पाणी असल्याने स्थानिक उद्भवातूनही तहान भागते.

जलसाठ्याचा फायदा कोणत्या घटकांला?
शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असून, आणखी एक उन्हाळी आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच पिण्याचे पाणी व उद्योग क्षेत्रालाही अडचण नाही.

जिल्ह्यात किती टँकरने पाणी पुरवठा?
पाणी टंचाई नसल्याने सद्यस्थितीत एकही टँकरने पाणीपुरवठा नाही.

नगर शहराच्या गरजे एवढ्या पाण्याची होते वर्षभरात वाफ
अहमदनगर महापालिकेमार्फत पिण्यासाठी दरवर्षी सुमारे १ हजार ९२६ दशलक्ष घनफूट पाण्याचे मुळा धरणाकडे आरक्षण आहे. तेवढे पाणीही उचलण्याची क्षमता मनपाकडे नाही. शहराला पुरेल एवढ्या १ हजार ४५० दशलक्ष घनफूट पाण्याची वाफ एकट्या मुळा धरणातून वर्षभरात वाफ होतेय.

मुळा : १३ हजार १९१ दलघफू उपयुक्त पाणी, एकूण साठा ६६.१९ टक्के
भंडारदरा : ७ हजार २०५ दलघफू उपयुक्त पाणी, एकूण साठा ६६.१० टक्के
निळवंडे : ४ हजार ४८१ दलघफू उपयुक्त पाणी, एकूण साठा ५४.६९ टक्के

बातम्या आणखी आहेत...