आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा इतिहासाचा:सीनेवरचा ऐतिहासिक लोखंडी पूलही जपायला हवा

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या रूपानं नगरच्या “पूल वैभवा”त भर पडली आहे. या पुष्पासन अनवद्या १०० मीटरवर असलेला लोखंडी पूल जतन केला, तर शहराचं सौंदर्य आणखी वाढू शकेल. सन १८६९ ते ७३ दरम्यान सीना नदीवर बांधलेला धनुष्याकृती कमानींचा भारतातील पहिला लोखंडी पूलही नगर शहरात आहे. त्याचा एकही नट-बोल्ट अजून निखळलेला नाही हे विशेष!

नगर शहरात “झुलता पूल”, “लकडी पूल” आणि “लोखंडी पूल” असे तीन वैशिष्ट्यपूर्ण पूल आहेत. दोन लोखंडी साखळदंडांच्या साहाय्याने सन १८३२ मध्ये उभारलेला नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या खंदकावरील झुलता पूल हा अशा प्रकारचा महाराष्ट्रातील पहिलाच पूल! त्याचं रिस्टोरेशन आर्मी सध्या करत आहे. या पुष्पासन काही अंतरावर भिंगार नाल्या वर लकडी पूल आहे. लश्करों तो “हेरिटेज लिंक ब्रिज” म्हाणी जतन केला आहे. सीना नदीवरच्या धनुष्याकृती कमानी असलेला लोखंडी पूल पुढच्या वर्षी दीडशे वर्षांचा होईल. रेल्वेस्टेशनकडे जाण्यासाठी आता शेजारीच नवीन पूल झाला आहे.

त्यामुळे जुना ऐतिहासिक लोखंडी पूल जतन करून पादचारी व फिरायला येणाऱ्यांसाठी “गार्डन ब्रिज”मध्ये त्याचं रूपांतर करायला हवं, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे. सक्कर चौक ते जीपीओदरम्यान झालेल्या नवीन उड्डाणपुलावर शिवचरित्राबरोबरच नगरमधील ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक स्थळांची चित्रं रंगवली गेली, तर नगरचा पर्यटन विकास व्हायला मदत होऊ शकेल. निदान पर्यटनस्थळांकडे जाणारे सचित्र दिशादर्शक तरी पुलावर आणि पुलाखाली उभारायला हवेत.

न्यायालयाची द्विशताब्दी
विस्तारित अहमदनगर जिल्ह्याला या वर्षी, तर येथील न्यायालयाला पुढच्या वर्षी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. सन १८२२ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात नाशिकमधील वणी आणि सोलापूरमधील करमाळ्यापर्यंतचा प्रदेश समाविष्ट करण्यात आला. १८६९ मध्ये ती गावे वगळल्यानंतरही अहमदनगर हा क्षेत्रफळानं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचा लौकिक टिकवून आहे.

अहमदनगरला मुन्सफ न्यायालय १८२३ मध्ये, तर जिल्हा न्यायालय १८२७ मध्ये सुरू झालं. न्यायालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव (१५० वा वर्धापन दिन) १९७२-७३ मध्ये साजरा झाला होता. २०२३ मध्ये द्विशताब्दी साजरी करण्यासाठी पुरेसा अवधी असल्यानं आतापासून नियोजनबद्ध तयारी सुरू करायला हवी.

मेहेरबाबांच्या आगमनाची पुढील वर्षी शताब्दी
अवतार मेहेरबाबांची समाधी नगरजवळ असलेल्या मेहेराबादच्या टेकडीवर आहे. अरणगावला मेहेरबाबा आले ते मे १९२३ मध्ये. आज ८० हून अधिक देशांतील मेहेरप्रेमी मेहेराबादला येत असतात. मेहेरबाबांच्या आगमनाच्या शताब्दीचं निमित्त साधून नगर शहराची प्रतिमा अधिक उजळ करण्याची संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...