आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने लंपास:नगरमध्ये घर फोडून 41 तोळे सोने लंपास ; तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिस्तबाग चौक परिसरातील सुदर्शन हौसिंग सोसायटीत चोरट्यांनी राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तब्बल ४१.५० तोळे सोन्याचे दागिने व १० हजारांची रोख रक्कम लंपास केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित अरविंद गर्गे (५५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या नातीच्या नामकरणाचा कार्यक्रम असल्याने त्यांचे नातेवाईक घरी आले होते. शुक्रवारी रात्री उशिराने सगळे झोपले. शनिवारी सकाळी घरकाम करणारी महिला नेहमीप्रमाणे कामासाठी आली असता घराचा किचनचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचे दिसले. घराची पाहणी केली असता किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बॅगमधील ४१.५० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...