आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखी आश्वासन:रस्त्यासाठीचे उपोषण माजी आमदार जगताप यांच्या मध्यस्थीने मागे

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विसापूरनजिक असलेले मुंगुसगाव नेहमीच चर्चेत आहे. या गावापासून मुंगुसगाव फाट्यापर्यंतचा रस्ता अनेक दिवसांपासुन दुरुस्तीपासून वंचित होता. ग्रामपंचायत स्तरांवरुन या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल महसुल विभागाने न घेतल्याने मुंगुसगाव येथील ग्रामस्थ श्रीगोंदे तहसीलसमोर उपोषणास बसले होते.मात्र माजी आमदार राहुल जगताप व घन:शाम शेलार यांनी मध्यस्थी केल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले. रस्ता मोजणीची मागणी केली असताना प्रत्यक्ष घटनास्थळी तत्कालिन तहसिलदार चारुशिला पवार आल्या होत्या.

प्रशासन कोणाच्या म्हणण्यानुसार काम करत आहे, इतके दिवस का लागले, या विषयाची दखल का घेतली नाही, अशी विचारणा यावेळी ग्रामस्थ करत होते. ग्रामस्थांना शांत करत प्रशासनाची बाजू समजून घेऊन दि. २० डिसेंबर रोजी रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु करु, असे महसूलच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी हे उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...