आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ग्रामीण भागात खेळाचे महत्त्व वाढले पाहिजे

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे दुर्लक्ष केले आहे.विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे. शालेय क्रीडा स्पर्धेमधून विद्यार्थी घडला जातो. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी केले.

नगर तालुक्यातील डोंगरगण येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या हस्ते झाले. मांजरसुंबा गावचे माजी सरपंच जालिंदर कदम, कमिन्स कंपनीचे प्लॅट हेड संजय बाबर, सोमनाथ चॅटर्जी, तुकाराम वाखारे, महेश भराडीया, सरपंच वैशाली मते, मंगल कदम, राधिका प्रभुणे, बबन पठारे, संतोष पठारे, कैलास पठारे, रामदास भुतकर, अक्षय कदम, जगदीश भराडिया उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...