आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:सिद्धिविनायक प्रतिष्ठिनचा उपक्रम कौतुकास्पद

करंजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून गणपती उत्सव साजरा करणाऱ्या तिसगाव येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी केले. गणपती उत्सवानिमित्त सिद्धिविनायक प्रतिष्ठान व अष्टविनायक रक्तपेढी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटन सरपंच लवांडे तसेच डॉ. भा. ह.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ६० रक्तपिशव्याचे संकलन करण्यात आले.सिद्धिविनायक प्रतिष्ठान गेल्या १८ वर्षापासून सामाजिक व सांस्कृतिक विकासकार्यासाठी काम करत आहे. दोन वर्षाचा कोरोना काळ संपल्यानंतर यावर्षी धार्मिक सामाजिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्विततेसाठी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, उपाध्यक्ष महेश लोखंडे, कल्याण लवांडे, योगेश मैड, लक्ष्मण गवळी, गणेश लवांडे, धीरज मैड, सोमनाथ वांढेकर, गणेश जंगम, यशपाल गांधी, संदिप पाठक, देविदास माने आदी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...