आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सराईत गुन्हेगाराला केले जिल्ह्यातून हद्दपार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सरवर ऊर्फ भिम्या असलम शेख (वय २९ रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे हद्दपार गुन्हेगाराचे नाव आहे.

झेंडीगेट व नगर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या शेख विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावावर निर्णय घेत शेख याला नगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार केले आहे. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेख याला ताब्यात घेत त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...