आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:इस्त्रीच्या दुकानाला आग लागून कपडे तसेच इतर साहित्य जळून खाक

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील क्रांतीचौक परिसरात असलेल्या इस्त्रीच्या दुकानाला आग लागून कपडे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. मंगळवारी पहाटेच्या वेळी राहुरी शहरातील क्रांतीचौकात आगीची ही घटना घडली. महेश शिंदे यांचे राहुरी शहरातील क्रांतीचौक परिसरात इस्त्रीचे दुकान आहे. दुकान चालवून ते आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. ६ जूनला रात्री दुकान बंद करून महेश शिंदे घरी गेले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इस्त्रीच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहील्याने या घटनेची महेश शिंदे यांना तात्काळ माहिती देण्यात आली.

महेश शिंदे यांनी दुकानाकडे धाव घेऊन परिसरातील नागरीकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तिव्रता मोठी असल्याने इस्रीसाठी आलेले ग्राहकांचे कपडे, फर्निचर व इतर काही सामान पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच कामगार तलाठी रवींद्र बाचकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...