आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील नऊ प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीतील मोठा अडथळा दूर झाला आहे. या नऊ रस्त्यांसह केडगाव उपनगर परिसरातील पाच प्रमुख रस्ते व सावेडी उपनगर परिसरातील सिव्हील हडको परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तब्बल १४ कोटी २४ लाख १७ हजार ३१ रुपये खर्चाच्या या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. ‘दिव्य मराठी’ने ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित करताना, तेथील परिस्थितीकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते. महापौर रोहिणी शेंडगे यांनी त्याची दाखल घेत, शासनाकडून मंजूर झालेल्या १५ कोटींच्या निधीतून तेथील नऊ रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. तसेच केडगाव उपनगर भागातील प्रभाग क्रमांक १६ मधील पाच प्रमुख रस्त्यांची कामे यात समाविष्ट केली होती. जवळपास दहा कोटी रुपयांचा निधी या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मंजूर करण्यात आला.
केडगाव उपनगरातील मंजूर रस्त्यांची कामेकेडगाव उपनगरातील झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर भागात राधेश्याम कॉम्प्लेक्स ते फुंदे घरापर्यंत, अयोध्यानगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजीनगर सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोडपर्यंत अशा पाच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. सिव्हिल हडकोतील प्रमुख रस्ता होणारसिव्हिल हडको परिसरातील प्रमुख रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. महापौर शेंडगे यांनी हडकोतील मेघाग्नी चौक ते हिरानंदानी मार्ग ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब व पराग कॉर्नर ते भगत मळापर्यंत रस्त्याचे काम प्रस्तावित केले आहे. सुमारे ४.७५ कोटीं च्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची निविदा प्रसिद्ध होणार आहे.
इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये या रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरणइंडस्ट्रीयल इस्टेटमधील नगर अर्बन बँक ते सुमेश इंडस्ट्रीज, महावीर इंडस्ट्रीज ते सौरभ इंडस्ट्रीज, मे. नेक टेक्निकल ते सारडा फॅशन्सपर्यंत, ॲटो इंजिनिअर्स ते चोपडा पॉलीपर्यंत, मे.धनलक्ष्मी एंटरप्रायझेस ते न्यू दत्त मुद्रणालयपर्यंत, मे. सुप्रिम इंडस्ट्रीयल ते आझाद सॉ मीलपर्यंत, यशका इंडस्ट्रीज ते मायक्रोटेक इंडस्ट्रीज, ओम इलेक्ट्रीकल्स ते सुचि इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल गेट ते नवकार स्टोअर व रुपरतन मेटल ते महावीर फरसाणपर्यंत अशा नऊ रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण होणार आहे.
सिव्हिल हडकोतील प्रमुख रस्ता होणारसिव्हिल हडको परिसरातील प्रमुख रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. महापौर शेंडगे यांनी हडकोतील मेघाग्नी चौक ते हिरानंदानी मार्ग ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब व पराग कॉर्नर ते भगत मळापर्यंत रस्त्याचे काम प्रस्तावित केले आहे. सुमारे ४.७५ कोटीं च्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची निविदा प्रसिद्ध होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.