आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:शहर विकासासाठी दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे; निधी कमी पडू देणार नाही : मंत्री भरणे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आ.संग्राम जगताप करत आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहर विकासासाठी नियोजनबद्ध सुरू असलेले त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. शहर विकासासाठी दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. आमदार जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे नगर शहराला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

केडगाव ते आरणगाव रस्ता व देवीरोड पुलाचे भूमिपूजन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, कार्याध्यक्ष प्रकाश भागानगरे, नगरसेवक अविनाश घुले, मनोज कोतकर, संजय चोपडा, राहुल कांबळे, सुरज शेळके आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, केडगाव उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे. नवरात्र उत्सवामध्ये केडगाव देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु पूर्वीच्या काळात या रस्त्याची कामे झाली नव्हती. मी महापौर झाल्यानंतर केडगाव देवी रस्त्याचे काम मार्गी लावले. आता रस्त्यावरील पुलाचे कामही मार्गी लावले. तसेच केडगाव- आरणगाव रस्त्याचे कामही मार्गी लावले आहे. नगरसेवक कोतकर म्हणाले की, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आमदार जगताप यांनी केडगावच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. विकास कामे करणाऱ्यांच्या सोबत आम्ही उभे राहतो. आमदार जगताप यांनी महत्वाचे प्रश्न मार्गी लावल्यामुळे केडगाव उपनगराच्या विकासाला चालना मिळाली.

सीना नदीवरील पूल नाबार्ड योजनेंतर्गत मंजूर करणार
बोल्हेगाव - सावेडी रस्ता नगर शहराला जोडणारा जवळचा रस्ता आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार सीना नदीवरील पुलाला नाबार्ड योजनेअंतर्गत मंजुरी देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री भरणे यांनी दिले. बोल्हेगाव गावठाण परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभही भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ढवन वस्ती येथे विविध कामांचा शुभारंभ
आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून ढवणवस्ती येथे पिण्याच्या पाण्याची लाईन, भिस्तबाग महाल ते कॉटेज कॉर्नर पर्यंत रस्त्याचे काम तसेच वडगाव गुप्ता रस्त्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक दीपाली बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, मीना चव्हाण आदी उपस्थित होते. संग्राम जगताप यांच्यामुळे आमच्यासारख्या युवकांना राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. त्याचा उपयोग करू. जनतेचे प्रश्न मार्गी लावले जात असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...