आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधातनगरचा जैन समाज बंदमध्ये सहभागी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन झारखंड सरकारच्या शिफारशीवरून केंद्रीय वन मंत्रालयाने झारखंडमधील गिरदीश जिल्ह्यातील मधुवन येथील जैन तीर्थ श्री सम्मेद शिखर 'पारसनाथ पर्वतराज' म्हणून घोषित केले. जैन समाजाच्या कोणत्याही हरकती किंवा सूचनेशिवाय अधिसूचना जारी करून पर्यटन स्थळाचा घेतलेला निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नगर शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, या मागणीसाठी जैन समाजाने बुधवारी (आज) पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये नगरचा जैन समाजही सहभागी होणार आहे.

ओसवाल पंचायत संघाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, महावीर बडजाते, मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीना चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, अशोक गांधी, रवींद्र बाकलीवाल, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, कौशल पांडे, अजय गंगवाल, संतोष गांधी, शैलेश मुनोत, कमलेश गांधी, संदीप शहा आदींसह जैन समाजबांधव उपस्थित होते.

सम्मेद शिखर हे २० जैन तीर्थंकर आणि अनेक संतांचे मोक्षस्थान आहे. पारसनाथ तीर्थराज हे इको सेन्सेटिव्ह झोन, पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे हॉटेल्स, मांसाहारी पदार्थांची विक्री आणि दारू विक्री केंद्र उघडले जातील. यातून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खुलेआम मांसाहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैन धर्माचा मूळ सिद्धांत असलेल्या अहिंसेचा अनादर होणार आहे. त्यामुळे जैन धर्मीयांमध्ये प्रचंड नाराजी असून सदर निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...