आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वज अनावरण:जैन ध्वजात अहिंसा, शांती, प्रेम, धन व विजयाचे प्रतिक; भाजपचे उपाध्यक्ष जाजू यांचे प्रतिपादन, आनंदधाम परिसरात ७२ फूट उंच ध्वज

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्य, अहिंसेचा संदेश देत भगवान महावीरांनी समस्त जीव, मानवकल्याणाच महान मंत्र दिला. जैन धमिर्यांचा पंचरंगी ध्वज याचेच प्रतिक आहे. अहिंसा, शांती, प्रेम, धन, विजय यांचे प्रतिक असलेले हे पंचरंग जैन ध्वजात आहेत. नगरमध्ये आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनी महाराष्ट्रातील सर्वात उंच जैन पंचरंगी ध्वजाचे अनावरण झाले ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी केले.

सकल राजस्थानी युवा मंचच्या पुढाकारातून आनंदधाम परिसरात ७२ फुट उंचीचा जैन पंचरंगी ध्वज उभारण्यात आला. या ध्वजाच्या अनावरणप्रसंगी जाजू बोलत होते. कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र भाजप जैन प्रकोष्टचे अध्यक्ष संदीप भंडारी, जैन श्रावक संघाचे हस्तीमल मुनोत, नरेंद्र फिरोदिया, विलास लोढा, सी.ए. रमेश फिरोदिया, सुवेंद्र गांधी, उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, नगरसेवक विपुल शेटिया, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, संतोष गांधी, वसंत लोढा, सकल राजस्थानी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष धनेश कोठारी, सुदर्शन डुंगरवाल, रोशन चोरडिया, नितीन गुगळे, मुकुंद धूत, संदेश मुनोत, धीरज लोढा, अमित अनेचा, निरज काबरा, अमित मुथा, पारस चुडीवाल, गौतम भंडारी, मनीष सोनग्रा, योगेश मुथा, नवरतन डागा, नवनाथ गहिले, महिला मंचच्या दीपाली कोठारी, स्वीटी बलदोटा, स्वाती मुनोत, विशाका ताथेड, आकांक्षा चोरडिया, प्रणिता भंडारी, अर्पिता शिंगवी, शितल मालू, कल्पना गुगळे, प्रतीक्षा लोढा, मनिषा भराडीया, सोनम देसरडा, योगिता कर्नावट, अर्चना झंवर उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, आचार्यश्रींच्या पदस्पर्शाने नगरची भूमी पावन पवित्र झालेली आहे. येथील जैन समाज अतिशय गुण्यागोविंदाने वास्तव्य करून शहराच्या विकासात मोठे योगदान देत आहे. याठिकाणी बसविण्यात आलेला जैन पंचरंगी ध्वज सर्वांसाठीच प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास आहे.

धनेश कोठारी म्हणाले, राष्ट्राप्रमाणे धर्माचा ध्वजही अस्मितेचे प्रतीक असतो. भगवान महावीर यांच्या २५०० व्या निर्वाण उत्सवानिमित्त आचार्य विद्यानंदजी मुनीराज यांनी जैन साधू संतांशी चर्चा करून जैन धर्मियांच्या पंचरंगी ध्वजाची निर्मिती केली. यातील पाचही रंग महत्त्वपूर्ण आहे. महान तत्त्वज्ञान देणारे आहेत. नगरमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जैन ध्वज उभारताना विशेष आनंद होत आहे. सूत्रसंचालन सागर देसरडा यांनी केले. आभार सुदर्शन डुंगरवाल यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...