आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चावी बनविणाऱ्याने घरातून पळवले दागिने

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपाटाला नवीन चावी बनवून देणार्‍याने महिलेची नजर चुकवून कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. नेप्ती रोडवरील एकनाथनगरमध्ये शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनुराधा सचिन पवार (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या घरातील कपाटाची चावी हरवली होती.

शनिवारी त्यांच्या गल्लीत चावी बनविणारा आला होता. त्याला कपाटाची नवीन चावी बनविण्यासाठी घरात नेले. त्याने चावी तर बनवली नाही, मात्र कपाटात ठेवलेले दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

बातम्या आणखी आहेत...