आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मागासवर्गीय महामंडळामार्फत बँकेने दिलेले कर्ज माफ करावे

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागासवर्गीय व बहुजन समाजाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र विकास महामंडळ, खादी उद्योग केंद्र विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ, चर्मकार विकास महामंडळ व ओबीसी विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, सुवर्ण महामंडळ नगरपालिका आदी महामंडळामार्फत बँकेने दिलेले कर्ज माफ करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष साहेबराव काते, सुनील उमाप, विजय वडागळे, सुनील सकट, संतोष शिरसाट, आशा पालवे, स्वाती येमुल, रेखा सामल, राजेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.महामंडळातून कर्ज घेतलेले बहुजन समाजातील नागरिक अडचणीत आहेत. बऱ्याच वर्षापासून कर्जमाफीसाठी आंदोलने, उपोषणे, रस्ता रोको व मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी निवेदने दिलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...