आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:‘क्रिप्टो’त गुंतवणुकीचे अमिष; लाखोंची फसवणूक; जणांविरूध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर व क्रिप्टो ट्रेडींगमध्ये गुंतववणूक करा भरपूर कमिशन व फायदा मिळेल असे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल प्रकाश पवार (रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरून सुशिलकुमार केशव शिसोदिया, शैलेष सुशिलकुमार शिसोदिया, सुषमा सुशिलकुमार शिसोदिया (औरंगाबाद, ह.मु. परभणी), नामदेव दत्तात्रय नाईकपाटील (रा.परभणी), नितीन बाळासाहेब लांडे (रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर), अशोक सूर्यभान डांगे, बेबी अशोक डांगे (रा. पुणतांबा, ता. राहाता) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिलकुमार व शैलेष शिसोदिया यांची सी. सी. ट्रेडर्स भागीदारी फर्म आहे.नितीन लांडे व अशोक डांगे हे आपल्या ओळखीचे असून त्यांनी सी.सी.ट्रेडर्समध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यानुसार आपण व प्रसाद बाजीराव देशमुख यांनी विश्वास ठेवला. आपण एचडीएफसी बँक शाखा नगर यांचे ३० लाखांचे कर्ज घेतले व साडेचार लाख रूपये नातेवाईकांकडुन उसनवार घेतले.

आपण २२ लाख ८४ हजार ५०० व देशमुख यांनी १६ लाख १७ हजार ५०० रूपये एवढी रक्कम शिसोदिया यांच्या इंडसइंड बँक शाखा औरंगाबाद व युनियन बॅंक शाखा औरंगाबाद या खात्यावर जमा केली. त्यानंतर त्यांनी आपल्याला ८ लाख ६४ हजार ५६४ रूपये व देशमुख यांना १ लाख ९९ हजार ५१६ रूपये परत केले. प्रत्येक महिन्याचे कमिशन पोटी ट्रेंडिंग प्रॉफीट म्हणून २४ महिने प्रतिमहिना २ लाख ८२ हजार ३० रूपये इतकी रक्कम व एकुण ट्रेडिंग प्रॉफीट म्हणून ६७ लाख ६८ हजार ७२० रूपये देऊ, असे आश्वासन दिले. त्यापोटी ५ लाख ६४ हजार ६० रुपयांचा धनादेश दिला. व सात धनादेशही दिले. त्यापैकी दोन धनादेश वटले नाही. म्हणून वेळेवेळी पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी बहाणा करून रक्कम देण्याचे टाळले. फसवणूक केल्याप्रकरणी २३ जुलै २०२१ रोजी तक्रार केली. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन शहर पोलिसांत सातजणांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...